Home मनोरंजन वयाच्या केवळ ४४व्या वर्षी रविना टंडन होणार आजी!

वयाच्या केवळ ४४व्या वर्षी रविना टंडन होणार आजी!

0

९० च्या दशकात गाजलेली बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लवकरच आजी होणार आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत असलेली ही बातमी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण हे खरं आहे. कालच रविनाने केलेल्या इंस्टाग्राम पोस्ट वरून हे जगासमोर आले आहे. वयाच्या केवळ ४४व्या वर्षी रविना आजी होत आहे.

२००४ साली अनिल थडाणी या फिल्म distributer युवकाशी रविनाने लग्न केले होते. यावरून तिच्या मुलांचे वय जेमतेम १३ ते १४ वर्ष असेल असे आपण म्हणू शकतो. मग तरीही ती आजी कशी होणार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे उत्तर म्हणजे रविनाने लग्नापूर्वीच १९९५ मध्ये पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले होते. तेव्हा पूजा ११ वर्षांची तर छाया ८ वर्षांची होती. यातील छायाचे २०१६ साली शॉन मेंडेस या तरुणाशी लग्न झाले व ती आता आई होणार आहे. म्हणजेच छायाची आई रविना आजी होणार आहे. या बातमीने अत्यंत खुश असलेल्या रविनाने नुकताच डोहाळजेवणाचा कार्यक्रम साजरा केला.