भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह डिसेंबर 11, 2017 रोजी इटलीमध्ये झाला आणि नुकतीच त्यांनी गुड न्युज दिली आहे.
विराटनं ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये, आम्ही आता Then, we were three! असे कॅप्शन दिले आहे. जानेवारी 2021 ला नवा पाहूना येणार असल्याचे सांगितले. विराटनं शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे. विराटनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विराट-अनुष्का एकत्र मुंबईतील त्यांच्या घरी होते. याकाळात दोघांनी एकमेकांसोबत अनेक आठवणी तयार केल्या. याचे फोटो आणि व्हिडीओ विराट-अनुष्का सोशल मीडियावर शेअर केले आहे. विराट सध्या मुंबई मध्ये नसून आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएइला आला आहे आणि अनुष्का मुंबईत आहे. विराट आणि अनुष्कानं दिलेले हे सरप्राइज चाहत्यांसाठी खास आहे.