Home मनोरंजन ऐश्वर्याने २०१५ मध्ये ‘छपाक’ सिनेमाला पडद्यावर कुरूप दिसायचे नसल्याचे कारण देत नाकारलं...

ऐश्वर्याने २०१५ मध्ये ‘छपाक’ सिनेमाला पडद्यावर कुरूप दिसायचे नसल्याचे कारण देत नाकारलं होतं

0

सध्या भरपूर चर्चेत असणारा ‘छपाक’ सिनेमा ट्रेलर आल्याच्या दिवसापासून निरनिराळ्या गोष्टींमुळे वादात अडकत गेला. त्यानंतर अभिनेत्री दीपिकाने दिल्लीत JNU च्या विद्यार्थ्यांना भेट दिल्या नंतर वादाने तर अचानक पारा गाठला. दरम्यान अनेकांनी दीपिकाला पाठींबा दिला तर अनेकांनी तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला. या संदर्भात आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला आहे. लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार सिनेमा प्रदर्शित होण्याआधी फिल्ममेकर्सवर ‘स्क्रीप्ट चोरी केल्याचा’ आरोप करण्यात आला होता. २०१५ ला ‘ब्लॅक डे’ नावाच्या स्क्रीप्टचे राकेश यांनी राइटर एसोशिएसनकडे रजिस्ट्रेशन केले होते. एवढंच नाही तर राकेशने सिनेमासाठी कंगना राणावत, प्रियंका चोपड़ा, श्रद्धा कपूर, ऐश्वर्या राय बच्चन व अनुष्का शर्मा यांच्याकडे विचारणा देखील करीत होते.

रिपोर्ट नुसार कंगनाच्या बहिणीवर ऍसिड हल्ला झाल्याने कंगना साठी हा अतिशय गंभीर विषय होता. म्हणून तिने हा सिनेमा नाकारला. प्रियंका चोपड़ा बाहेर देशात तिच्या शूट साठी व्यस्त होती. श्रद्धा कपूरला असे रोल करायचे नव्हते अशी माहिती मिळत आहे तर अनुष्का शर्माला पुढील दोन वर्ष शूट साठी तारीख मिळत नव्हती. मात्र या सर्व अभिनेत्रींपैकी सर्वात जास्त धक्कादायक प्रकार होता तो ऐश्वर्या राय बच्चनचा. ऐश्वर्याने हे सांगून नकार दिला की, तिला पडद्यावर कुरूप दिसायचे नाहीये.