Home मनोरंजन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमाचे नाव अखेर बदलले

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमाचे नाव अखेर बदलले

0
Image credit: Bollywood bubble

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबरला डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. रिलीज होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ असे करण्यात आल्याचे तरण आदर्श यांनी ट्विट करून सांगितले.

या चित्रपटात अक्षय कुमार एका तृतीयपंथ्याची भूमिका साकारणार आहे. मात्र चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. या चित्रपटाच्या टायटलमुळे हिंदू देवता लक्ष्मी देवीचा अपमान होत असल्याचे काही संघटनांचे मत होते. त्यामुळे श्रीराजदूत कर्णी संघटनेने अक्षय कुमारला चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी लीगल नोटीस पाठवली होती.

https://www.instagram.com/p/CGfBzi2n9yB/?utm_source=ig_web_copy_link

याशिवाय हा चित्रपट हिंदुविरोधी असून लव्ह जिहादचे समर्थन करतो असेही काहींचे म्हणणे होते. ज्येष्ठ अभिनेता मुकेश खन्ना यांनीदेखील चित्रपटाच्या नावावर प्रश्न उपस्थित केला होता. या सर्व बाबींचा विचार करून अक्षय कुमारने अखेर चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ असे केले आहे. हा चित्रपट २०११ सालच्या ‘कंचना’ या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे.

https://www.instagram.com/tv/CGHRVv9nUdu/?utm_source=ig_web_copy_link