Home मनोरंजन अक्षयची ‘गुड न्यूज’ सलमानची ठरली आहे बॅड न्यूज!

अक्षयची ‘गुड न्यूज’ सलमानची ठरली आहे बॅड न्यूज!

0

अक्षय कुमारने यंदा एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट केले आहेत. केवळ केलेच नाहीत तर बॉक्स ऑफिस मध्ये देखील धूम केली. त्यातल्या त्यात तर ‘गुड न्यूज’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अगदी नावाप्रमाणे अक्षयला गुड न्यूज दिली आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून सलमान खानच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाला देख अक्षयच्या ‘गुड न्यूज’ ने मागे टाकलं आहे. परिणामी अक्षयची ‘गुड न्यूज’ सलमानची ठरली आहे बॅड न्यूज!

मीडिया रिपोर्ट नुसार ‘गुड न्यूज’ चित्रपटाने दोन दिवसांत ३९ कोटी ३४ लाख रुपये कमावले असून ‘गुड न्यूज’ सलमानच्या ‘दबंग ३’ वर भारी पडला आहे. प्रेक्षकही या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत असून अक्षयच्या विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये आणखी एका अनोख्या चित्रपटाची भर पडली आहे.