अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्सचा मुद्दा समोर आला आहे. यामधून अनेक बॉलीवूड सेलिब्रिटिची नावे समजली आहेत. ते प्रकरण अधिकच चिघळत चालले आहे.
खासदार रवी किशन यांनी ड्रग्सचा मुद्दा लोकसभेत मांडल्यानंतर खासदार जया बच्चन यांनी बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असं सांगत त्यांच्यावर पलटवार केला.त्यानंतर कंगना रनौत ला उद्देशून त्या बोलल्या की ,काही जण ज्या ताटात जेवतात त्यालाच छिद्र पाडतात, हे चुकीचं आहे.
या प्रकरणामध्ये आता अभिनेत्री जया प्रदा यांनी रवी किशन, कंगना राणौतला पाठिंबा देत जया बच्चन यांना थेट आव्हानाचं दिलं आहे. त्या बोलल्या की, बच्चन कुटुंब जे बोलतं ते जग ऐकण्यासाठी तयार असतं. त्यामुळे माझं बच्चन कुटुंबाला आव्हान आहे तुम्ही या ड्रग्स माफिया आणि ड्रग्स एडिक्टेंड युवकांना सांभाळू शकता का? ड्रग्स प्रकरणावरुन जया बच्चन राजकारण करत आहे असाही आरोप त्यांनी केला.
जया बच्चन यांच्या भावनांचा मी सन्मान करते परंतु त्यांच्या भावनेतून फक्त राजकारण दिसत आहे असेही त्यांनी म्हटले.