मराठी चित्रपट आणि सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी प्राजक्ता माळी चांगलीच अडचणीत सापडली आहे. एका शो दरम्यान केवळ दिलेले कपडे चांगले नाही या क्षुल्लक कारणावरून प्राजक्तानं चापटा गुद्यांनी मारहाण केल्याचा व शिवीगाळ केल्याचा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिनं करत प्राजक्ता माळी विरोधात ५ एप्रिल रोजी काशिमीरा पोलिस ठाण्यात एनसी दाखल केली होती.
पुढे मनचंदा यांनी माळी हिच्याविरुद्ध ठाणे न्यायालयात धाव घेत तक्रार केली. न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्याबद्दल तिच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.
या आरोपांसंबधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. मात्र, प्राजक्तानं तिच्यावरील आरोप खोटे आहेत असं सांगितले. त्याचबरोबर “माझे आणि तिचे कपड्यांवरून वाद झाले हे खरं आहे. पण तिला मी मारहाण केलेली नाही.” असंही प्राजक्ताने स्पष्टीकरण दिलं.
मटाच्या मीडिया रिपोर्ट नुसार न्यायालयाने समन्स बजावत २६ जून रोजी न्यायालयात सुनावणीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले होते. समन्स घेऊन पोलिस माळी हिच्या घरी धडकले. मात्र घरी कोणीच नव्हते. त्यामुळे समन्स परत आले. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. दरम्यान, जून महिन्यात या प्रकरणी न्यायाधिश व्ही. व्ही. राव जडेजा यांच्या न्यायालयात सुनावणी होती. मात्र माळी हिने दांडी मारल्याने सुनावणी होऊ शकली नाही. मनचंदा हिचे वकील पवार यांनी वारन्ट काढण्याबाबत न्यायालयाला विनंती केली. मात्र न्यायालयाने तूर्तास वॉरण्ट न काढता सुनावणीसाठी न्यायालयात पुन्हा एकदा उपस्थित राहण्याची माळी हिला संधी दिली. त्यामुळे आणखी एक समन्स न्यायालयाकडून पाठविले जाईल, असं सांगण्यात येत आहे.