छपाक चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताच रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. येत्या काळात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भरपूर कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच अचानक मध्येच माशी शिंकली आहे. ‘छपाक’ या हिंदी चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी व ‘फॉक्स स्टार’ने कथा चोरल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, ‘ब्लॅक
डे’ या आपल्या नोंदणीकृत कथेची चोरी करून फॉक्स स्टारने चित्रपट बनवल्याचा दावा लेखक राकेश भारती यांनी ल केला आहे. त्यांचे वकील अशोक सरोगी यांनी सदर याचिका कोर्टात दाखल केली असून या याचिकेवर सुट्टीकालीन खंडपीठ येत्या २७ डिसेंबरला सुनावणी करणार अशी माहिती मिळत आहे.