Home आरोग्य कोरोनाने केली जादू!९० च्या दशकातील रामायण महाभारत दूरदर्शनवर परत दाखवणार!

कोरोनाने केली जादू!९० च्या दशकातील रामायण महाभारत दूरदर्शनवर परत दाखवणार!

0

कधीकाळी रामायण महाभारत सुरु असताना रस्ते आज लॉकडाउन असल्यागत रिकामे व्हायचे आज परत कोरोना च्या विळख्यात सापडलेल्या देशाच्या भेटीला या प्रचंड गाजलेल्या मालिका परत येत आहेत. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आला आहे. यामुळे घरी असलेली लोक विविध प्रकारे त्यांचा वेळ घालवत आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे सर्व शुटिंग रद्द करण्यात असल्याने कुठलाही नवा चित्रपट किंवा मालिका सुद्धा प्रसिद्ध केले जात नाही आहेत.याचा फटका सिनेसृष्टीला होणारच आहे. पण टिव्ही चॅनल्सवर सध्या रिपिट टेलिकास्ट दाखवले जात आहेत. मात्र घरी बसून कंटाळा आलेल्या प्रेक्षकांसाठी दुरदर्शन त्यांच्या आठवणीतले दोन कार्यक्रम लवकरच प्रसारित करणार आहे. दुरदर्शने रामायण (Ramayana)-महाभारत (Mahabharata) पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.रामायण आणि महाभारत हे दुरदर्शन वरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय टिव्ही शो पैकी एक आहे.

रिपोर्ट्सनुसार, प्रसार भारतीचे शशि शेखर यांनी ट्वीट करत एका युजर्सला प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यावेळी शेखर यांनी असे म्हटले आहे की, रामायण-महाभारत कोणत्या वेळेत प्रसारित केले जाईल याची वेळ लवकरच जाहिर केली जाणार आहे. तर ‘द कपिल शर्मा’ या शो मध्ये सुद्धा रामायण कार्यक्रमातील स्टार कास्ट यांनी उपस्थिती सुद्धा लावली होती.

दरम्यान, रामानंद सागर निर्मित रामायण सन १९८७ मध्ये शुट करण्यात आले होते. तसेच बी. आर, चोपडा निर्मित महाभारताचे शुटिंग सन १९८८ मध्ये करण्यात आले होते. प्रथमच विज्ञानाच्या मदतीने छोट्या पडद्यावर भारतीय पौराणिक कथांवरली कार्यक्रम प्रसारित करण्यात आले होते. ज्यामुळे ह्या मालिका केवळ जास्तच पाहिले गेले नाहीत तर त्यांची लोकप्रियता आकाशाच्या उंचीपर्यंत गेली.