Home मनोरंजन कोरोनाच्या संकटात सुद्धा CAA विरोधी आंदोलकांना अटक होतांना पाहून जावेद अख्तर भडकले!

कोरोनाच्या संकटात सुद्धा CAA विरोधी आंदोलकांना अटक होतांना पाहून जावेद अख्तर भडकले!

0

एकीकडे देशातील नागरिक आणि सरकार कोरोनानं त्रस्त असताना, दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलकांना अटक करण्यावरून लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे. ‘देश करोना आणि त्याच्याशी निगडीत समस्यांशी झुंजत असताना गृह मंत्रालय सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात व्यग्र आहे’ असं ट्विट करत जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर ताशेरे ओढलेत.

देशभरात करोना संक्रमणाचे १ लाख ४५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लाखो स्थलांतरीत मजूर आजही रस्त्यावरून चालत जाताना दिसत आहेत. परंतु, या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या जाफराबाद भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील (CAA) आंदोलनात सहभाग घेणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे याचवरून जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयाच्या कार्यशैलीवर रोष व्यक्त केला आहे.

‘आपला देश करोना आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, बेरोजगारी, गरिबी या करोनापासून निर्माण झालेल्या समस्यांशी झुंज देत असताना आपले गृह मंत्रालय सीएएविरोधात (सुधारित नागरिकत्व कायदा) आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त आहे. त्यांची प्राधान्यता उर्वरित भारतापेक्षा वेगळी आहे’, असं म्हणत जावेद अख्तर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला आहे.