Home मनोरंजन कंगनाने नुकसान भरपाईसाठी उच्च न्यायालयात केली 2 कोटीची याचिका!

कंगनाने नुकसान भरपाईसाठी उच्च न्यायालयात केली 2 कोटीची याचिका!

0

मुंबई महानगर पालिकेने बेकायदेशीर रीत्या बंगल्यावर कारवाई केल्याने 2 कोटींचा नुकसान भरपाई ची याचिका कंगना रनौत ने उच्च न्यायालयाला केली आहे.

कंगनाची पाली हिल येथील बंगल्याचे जे अनधिकृत बांधकाम होते त्यावर ९ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली आणि लगेचच त्यावर स्थगिती मिळवण्यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात त्याविषयी याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने कारवाई वर स्थगिती देत याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

कंगनाने सुधारित याचिका दाखल करत म्हटले आहे की राज्य सरकारवर काही बाबी हाताळण्यासंदर्भात टीका केली असता त्यांनी थेट आपल्या बंगल्यावर च कारवाई केली आहे. मुंबईत न येण्याची ही धमकी मला देण्यात आली आहे त्यामुळे मुंबई त मला वाय प्लस सुरक्षा घ्यावी लागली. आणि केंद्र सरकारने दिलेल्या या सुरक्षेमुळेच मी मुंबईत येऊ शकले.