Home मनोरंजन करण जोहर बोलतो हे लोक माझ्या मुलांना मारुन टाकणार आहेत!

करण जोहर बोलतो हे लोक माझ्या मुलांना मारुन टाकणार आहेत!

0

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अनपेक्षित आत्महत्येनंतर सगळीकडून बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर भरपूर टीका सुरू आहे. यामध्ये दिग्दर्शक करण जोहरचं नाव अग्रस्थानी आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर लगेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याच्यावर जोरदार टीका करत त्याला ट्रोलही करण्यात आलं. या सर्व गोष्टींचा परिणाम करनवर झाला असून तो प्रचंड खचला आहे.

सोशल मीडिया वरून दिग्दर्शक करण जोहरवर टीका होऊ लागली. ‘करण सध्या प्रचंड वाईट परिस्थितीतून जातोय आहे. मात्र सुशांतच्या मृत्युमुळे लोक ज्याप्रकारे त्याच्यावर राग व्यक्त करत आहेत ते पाहून तो पूर्णपणे कोसळला आहे, असं त्याच्या मित्राने सांगितलं.

करणच्या मित्राने सांगितले की, त्याच्या संबधित लोक त्याच्यावर टीका करत असल्याने तो अधिक चिंतेत आहे. त्याच्या मुलांना मारण्याची धमकी येत आहे. करण आता बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. तो लढणे विसरला आहे. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो रडू लागतो. तो रडत रडत विचारतो की मी असे काय केले, ज्यामुळे मला हे सहन करावे लागत आहे.