Home मनोरंजन करणी सेनेने अक्षय कुमारला हाकलले; ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या सेटवर राडा

करणी सेनेने अक्षय कुमारला हाकलले; ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या सेटवर राडा

0

ऐतिहासिक मुद्द्यांवर आधारित बॉलिवूडमध्ये येणाऱ्या अनेक चित्रपटांबाबत सतत इशारा देत असणारी ‘करणी सेना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐतिहासिक तथ्य व बाबींशी छेडछाड केल्याचा आरोप करत अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’चे शूटिंग करणी सेनेने थांबवले आहे. याआधीही भन्साली यांचा चित्रपट ‘पद्मावत’ला करणी सेनेचा तीव्र विरोध सोसावा लागला होता.

करनी सेनेने चित्रपट ‘पृथ्वीराज’चे शूटिंग सुरू असताना सेट वर मोठा राडा करत हे शूटिंग बंद पाडले. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ‘पृथ्वीराज’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार राजपूत महाराज पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार असून एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, करणी सेनेने चित्रपटातील तथ्यांशी छेडछाड केल्याचे म्हणत शूटिंग थांबवले आहे.

महिपाल सिंह मकाराना यांच्या नेतृत्वाखाली येत करणी सेनेच्या सदस्यांनी ‘पृथ्वीराज’ च्या सेटवर पोहोचून गोंधळ करत संपूर्ण शूटिंग थांबवले. दिग्दर्शक प्रकाश द्विवेदी यांच्याशी भेत घेत करणी सेनेच्या सदस्यांनी त्यांना तथ्यांशी छेडछाड न करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर, जयपूरनजीक जमवारामगढ गावामध्ये सुरू असलेले शूटिंग थांबवण्यासाठी सांगण्यात आले.