Home मनोरंजन अर्णब गोस्वामींसोबत गैरवर्तन केल्याने कुणाल कामराला विमान प्रवास करण्यास सहा महिन्यांची बंदी!...

अर्णब गोस्वामींसोबत गैरवर्तन केल्याने कुणाल कामराला विमान प्रवास करण्यास सहा महिन्यांची बंदी! : काय आहे संपूर्ण प्रकरण?

0

स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर इंडिगो व एअर इंडिया या विमान कंपन्यांनी विमान प्रवासासाठी ६ महिन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे कुणाल सध्या न्यूजपेपर, न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

काय आहे सविस्तर प्रकार…
काही दिवसांआधी एका प्रतिष्ठित वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी इंडिगोच्या ६E ५३१७ विमानाने मुंबई ते लखनऊ प्रवास करीत होते. कुणाल देखील याच विमानातून प्रवास करीत होता. दरम्यान कुणालने अर्णब गोस्वामी यांच्याशी त्यांच्या इच्छेविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला. या वेळी कुणाला कॅमेरा ऑन करून व्हिडीओ देखील शूट करीत होता. त्याने अर्णब गोस्वामी यांना काही प्रश्न विचारले मात्र अर्णब गोस्वामी यांनी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. शेवटी कुणाल  अर्णब गोस्वामी यांना ‘भित्रा पत्रकार’ म्हणाला व त्याने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडल वर शेयर केला.

याच प्रकरणामुळे इंडिगोने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत सांगितले आहे की, “आम्ही कुणाल कामरा यांना इंडिगो विमानातून प्रवास करण्यावर सहा महिन्यांची बंदी घालत आहोत.”

इंडिगोच्या या ट्विटला दुजोरा देत एअर इंडियाने देखील हीच कारवाई करत, ‘अशी गोष्ट पुन्हा विमानात होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून कुणाल कामराला एअर इंडियाच्या विमानांमधून प्रवास करण्यास बंदी घातली आहे.’  एअर इंडियाने देखील आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर ट्विट शेयर करत ही माहिती दिली.

कुणाल कामराने मात्र एअरलाईन्सच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. त्याने देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत सांगितलं की, ‘माझ्यावर सहा महिन्यांची बंदी घातली त्यासाठी धन्यवाद. खरं सांगायचं झालं तर तुम्ही खूप दयाळू आहात. नरेंद्र मोदी हे एअर इंडियावर कायमची बंदी घालू शकतात.” असं कुणालाने उत्तर दिलं आहे.

कुणालने एयर इंडियाला दिलेलं उत्तर खालील प्रमाणे…