Home मनोरंजन Video : माय नेम ईज “रागा”! या सिनेमाचा टिझर पाहिलात का ?...

Video : माय नेम ईज “रागा”! या सिनेमाचा टिझर पाहिलात का ? राहुल गांधींवर सिनेमा

0

प्राईम नेटवर्क: गेल्या काही वर्षांत भाग मिल्का भागा, मेरी कॉम, एमएस धोनी,निरजा आणि टॉयलेट या चित्रपटांनी सिद्ध केले आहे की बायोपिक बनवणं हा जादूचा फॉर्म्युला आहे.. निवडणूकींचा सीझन सध्या चित्रपट सृष्टीतही सुरू असल्याने ‘ठाकरे’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘दि अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटानंतर आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही बायोपीक येणार आहे. राहुल गांधी म्हणजे सोशल मीडियामधील जोक्स ची जान. त्यांच्या अनेक भाषणावर त्यांना अजूनही ट्रोल केल जात त्यात त्यांची बायोपिक येणार म्हणजे नेटकर्‍यांना हुरूपच येणारं.

त्यांचा ‘माय नेम इज रागा’ हा बायोपिक लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच या चित्रपटाचा टिझरही रिलीझ करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीला कधी येणार याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.

या वर्षी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत.निवडणुक तोंडावर असल्यामुळे आपला प्रचार करण्यात सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी चित्रपट सृष्टीचा वापर करण्यात आला आहे.मात्र ही खेळी राजकीय मैदानात नाही,तर कलाकृतींच्या माध्यमातून जनतेसमोर आली आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा  ‘दिअ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा जीवनपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला.

तर 25 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा सिनेमा हिंदी आणि मराठी मध्ये प्रदर्शित झाला.काही दिवसांपूर्वी पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली.या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू होत नाही, तर लगेच त्यांचे विरोधक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याही बायोपीकचा टिझर आला आहे.फक्त 4.3 सेकंदच्या या टिझरमधून राहुल यांच्या बालपणापासून ते काँग्रेस अध्यक्ष होण्यापर्यंतची झलक पाहायला मिळते.रूपेश पॉल या पत्रकाराने या सिनेमाची पटकथा लिहीली आहे. बघूया हा बायोपिक कितपत कमाल दाखवतो ?