Home मनोरंजन दीपिकाला ‘या’ जाहिरातीतून हटवण्याची नेटकाऱ्यांची मागणी…

दीपिकाला ‘या’ जाहिरातीतून हटवण्याची नेटकाऱ्यांची मागणी…

0

JNU प्रकरणानंतर दीपिका पादुकोनच्या ‘छपाक’ चित्रपटावर मोठा परिणाम झाला. तो वाद शांत होतो न होतो की, दीपिकावर आणखी एक वाद निर्माण होत असल्याचं दिसत आहे. LUX हा साबण गेल्या अनेक वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात चांगल्या चांगल्या अभिनेत्रींसह आपल्या ब्रँडच्या जाहिराती करतो. हा साबण एकेकाळचा सर्वात जास्त विकणारा साबण होता. मात्र आता याच ब्रँडला वाचवायचे असेल तर दीपिकाला जाहिरातीतून काढण्याची मागणी नेटकरी करीत आहेत.

दीपिका सध्या अनेक जाहिरातींसह LUX ची देखील जाहिरात करते. ट्विटरवर सध्या #दीपिकाहटाओ_LUXबचाओ हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड करतोय. हा ब्रँड देशविरोधी असणाऱ्या हातात असल्याचंही ट्विट करण्यात येत आहे. काही लोकांनी तर असंही म्हटलं आहे की दीपिकाला आता कुठल्याही जाहिराती देऊ नयेत. एवढंच नाही तर या जाहिरातीवर जाहिरात कंपनी दोन आठवडे बंदी घालणार आहे अशीही माहिती मिळत आहे.