Home मनोरंजन केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर गुगलच्या ट्रेंडमध्येही ‘तानाजी’ ठरला अव्वल…

केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर गुगलच्या ट्रेंडमध्येही ‘तानाजी’ ठरला अव्वल…

0

दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ आणि अजय देवगणचा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या दोन्ही चित्रपटांनी पडद्यावर एकत्रित इन्ट्री घेतली. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शना आधी चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. परिणामी दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफीसवर जोरदार चर्चा सुरू होती. प्रदर्शित होण्यापूर्वी ‘छपाक’ सिनेमा ‘तानाजी’ पेक्षा जास्त लोकप्रिय होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र झालं अगदी या उलट. कमाईच्या बाबतीत छपाक ‘तानाजी’ पेक्षा खूप मागे राहिला असून तानाजी अगदी गुगल ट्रेंडमध्येही अव्वल आहे.

ABP माझाच्या एका रिपोर्ट नुसार तानाजी चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पाच दिवसांत सुमारे ९०.९६ कोटींची कमाई केली. मात्र तानाजीच्या तुलनेत सोबत प्रदर्शित होऊनही दीपिकाचा ‘छपाक’ बॉक्स ऑफिसवर खूपच मागे राहीला. छपाक चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पाच दिवसांत एकूण 23.37 कोटी रुपयांचा व्यवसाय केला अशी माहिती मिळत आहे. एकंदरीत बॉक्स ऑफिसवर आणि गुगल वर सध्या तानाजी सिनेमा हवा करत असून हा २०२० चा पहिला यशस्वी चित्रपट ठरला असं म्हणायला हरकत नाही.