Home मनोरंजन राणू मंडल वर पुन्हा जुने दिवस!

राणू मंडल वर पुन्हा जुने दिवस!

0


पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन कसेबसे दिवस काढणाऱ्या रानू मंडल यांच गाणं म्हणतांनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांंगलाच व्हायरल झाला होता. त्या एका व्हिडीओमुळे रानू मंडल यांंना बॉलिवूड मध्ये गाणं गाण्याची संधी सुद्धा मिळाली. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने रानू मंडलसोबत एक गाणं गायलं त्या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती सुद्धा दिली. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे एका रात्रीत स्टार झालेल्या रानू मंडल यांना आता पुन्हा पहिले दिवस परत आले असल्याची माहिती मिळत आहे. रानू मंडल यांना पूर्वीचं हलाखीचे जीवन जगावं लागतंय. त्यांनी स्टार झाल्यानंतर आपल्या चाहत्यांना दिलेल्या वागणूकीचा हा परिणाम असल्याचंही सांगितले जात आहे. प्रसिद्धी मिळाल्या नंतर चाहत्यांना दिलेल्या वागणुकीमुळे राणूवर प्रचंड टीका सुद्धा सोशल मीडिया वर झाली.


काही काळापूर्वी रानू मंडल यांनी एका चाहतीला सेल्फी न देता तिच्यावर रागावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचाच परिमाण म्हणून नेटकर्यांनी असंख्य मिम्स बनवत राणू मंडल ची खिचाई सुरू केली आणि बघता बघता राणू मंडल यांची सर्व प्रसिद्धी धुळीला मिळत आता त्या रेल्वे स्टेशन वर परत गाणे गात त्यांच्या पोटाची खळगी भरत आहेत.