२००८ साली आलेल्या आमिर खानच्या गजनी सिनेमाचा सिक्वल येणार अशी चर्चा सुरू आहे. सिनेमाच्या नायकाबद्दल सुद्धा सांगितलं जात आहे. तब्बल १२ वर्षांनंतर आता गजनीचा सीक्वल गजनी २ येणार आहे अशी माहिती समजल्यामुळे चाहतेही अगदी खुश आहेत. रिलायन्स एंटरटेंमेंटनं या एजन्सी ने गजनीबद्दल ट्विट केल्यानंतर गजनी २ बद्दल होणाऱ्या चर्चांनी जोर धरला आहे.
रिलायंस एंटरटेनमेंटच्या ट्विटर पेज वर एक फोटो शेअर झाला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘हा दोष गजनीला द्या.’ आणि त्या फोटोमध्ये ‘ही पोस्ट गजनीबद्दल होती परंतु आम्ही विसरलो की आम्हाला काय बनवायचं होतं ते.’ असं लिहिलंय. लोक या पोस्टला आमिर खानचा सिनेमा गजनीचा सिक्वल म्हणजेच गजनी २ मानत आहेत.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, गजनी २ ची अधिकृत घोषणा आमिर खान आपल्या ५५ व्या वाढदिवशी करू शकतो. आमिर खानचा वाढदिवस हा १४ मार्च रोजी आहे. आता या पोस्टमध्ये किती तथ्य आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे!