Home मनोरंजन ड्रग्सच्या संशयामुळे अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा!

ड्रग्सच्या संशयामुळे अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा!

0

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बंगळुर सेंट्रल क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी ड्रग्स प्रकरणामुळे छापा टाकला. मीडिया न्यूजनुसार विवेक ओबेरॉयचा मेहुणा अर्थात पत्नीचा भाऊ आदित्य अल्वा हा बंगळुरू ड्रग्स कनेक्शनमधील आरोपी असून तो सध्या फरार आहे. आदित्य अल्वा विवेक ओबेरॉयच्या घरी लपून बसला असल्याच्या संशयाने त्याचा शोध घेण्यासाठीच सेंट्रल क्राईम ब्रांच पोलिसांनी मुंबईत विवेक ओबेरॉयच्या घरावर धाड टाकली.

पुढारी च्या मीडिया रिपोर्टनुसार ‘सॅंडल वूड ड्रग्स’ प्रकरणाची नोंद कोट्टनपेट पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून त्यात आदित्य अल्वाचे नाव समोर आले. दिग्दर्शक इंद्रजित लंकेश यांनी कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘सॅंडल वूड ड्रग्स’मार्फत ड्रग्सचे व्यवहार सुरु असल्याची माँहिती सीसीबी पोलिसांना दिली होती. यात त्यांनी १५ जणांची नावे पोलिसांना दिली होती. त्यातील अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना गलराणी यांना पोलिसांनी अटक केले आहे.