प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख याने काल शिवाजी महाराजांच्या ३९०व्या जयंतीच्या मुहूर्तावर त्यांच्यावर आधारित चित्रपटाचा टीजर प्रदर्शित केला. ३० सेकंदांच्या या टीजरमधून रितेशच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ची निर्मिती सोबत सैराट फेम नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन तर विख्यात संगीतकार अजय अतुल यांचे संगीत असणार आहे असे कळून येते. रितेश देशमुख याने हा टीजर ट्विटरवर पोस्ट केले आहे.
चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि साधारणतः हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
नागराज मंजुळे यांनी सुद्धा ट्विट करत प्रेक्षकांच्या भेटीला शिवत्रयी घेऊन येत आहोत असे जाहीर केले. या शिवत्रयी मध्ये ‘शिवाजी, राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी’ अशा तीन वेगवेगळ्या कथानकांचा समावेश असेल.
याशिवाय रितेश त्याचा आगामी चित्रपट ‘बाघी 3’ मध्ये आपल्याला दिसणार आहे. हा सिनेमा ६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
नागराज मंजुळेसुद्धा त्यांच्या अमिताभ बच्चन सोबतच्या बहुचर्चित “झुंड” सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. हा सिनेमा ८ मे रोजी बॉक्स ऑफिस वर प्रदर्शित होणार आहे.