Home मनोरंजन वडील विलासरावांच्या आठवणीत रितेश गहिवरला, सोशल मीडिया वर व्हिडिओ व्हायरल

वडील विलासरावांच्या आठवणीत रितेश गहिवरला, सोशल मीडिया वर व्हिडिओ व्हायरल

0

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व तडफदार नेते विलासराव देशमुख यांची आज ७५ वि जयंती. अत्यन्त तुफानी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आणि बेधडक राजकारणी अशी विलासरावांची ओळख. त्यांच्या अनेक आठवणी, किस्से त्यांच्या समर्थकांना आजही प्रेरणा देत आहेत. आज विलासराव असले असते तर महाराष्ट्र अगदी वेगळा भासला असता असे म्हणणारे सुद्धा अनेक लोक आज आहेत.

‘अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या अखेरीस विलासरावांची तस्वीरही दिसते. तर रितेश आणि विलासरावांचा एक पाठमोरा फोटोही यामध्ये आहे. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असं लिहिलं आहे.

रितेशने शेअर केलेला व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्सही भावूक झाले आहेत. व्हिडीओसोबत रितेश देशमुखने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘हॅपी बर्थडे पापा, मी तुम्हाला दररोज मिस करतो.’ तसेच विलासरावांच्या 75व्या जयंतीनिमित्ताने अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. व्हिडीओ व्यतिरिक्त रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल फोटोही बदलला आहे. ज्यामध्ये विलासराव देशमुख यांना 75व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

रितेश देशमुख सह त्यांचे बंधू अमित आणि धीरज देशमुख तसेच पत्नी जेनेलिया देशमुख यांनी सुद्धा रितेश सारख्या सोशल मीडिया वर विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला.