Home मनोरंजन सई ताम्हनकरने घेतलाय यापासून ब्रेक घ्यायचा धाडसी निर्णय !

सई ताम्हनकरने घेतलाय यापासून ब्रेक घ्यायचा धाडसी निर्णय !

0

प्राईम नेटवर्क : मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हनकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे.डिजिटल डिटॉक्स ये है कया ? बातमी तर वाचा !

मराठी सिनेसृष्टीत २०१८ मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, कुस्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे,ह्या ना त्या कारणाने सई सातत्याने चर्चेत होती. पण आता सई ताम्हनकर सध्या सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणार आहे. तस अवघड काम हाय राव, पण बघू किती काळ दूर राहते ते.

सई ताम्हणकरला ह्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, “ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबूक ह्यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी काहीवेळ सोशल मीडियावरुन ब्रेक घेतेय. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे आहेत म्हणून मी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.”

तुम्हाला माहिती आहे का? सई ताम्हणकरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इन्स्टाग्रामवर सा़डेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत.अशावेळेस सई अचानक सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. इथे आपले २००-३०० फोलोवर्स असले तरी आपण किती भाव खातो अन हा असा धाडसी निर्णय इतके फोलोवर्स असताना घेण म्हणजे कौतुकचं करायला हव या पठ्ठीचं !

सूत्रांच्या अनुसार,जेव्हा सोशल मीडियावर एक मिलीयन फॉलोवर्स मिळवण्याच्या जवळपास शोबिझमधले सेलिब्रिटी असतात. तेव्हा ते जास्त पोस्ट आणि अपडेट्स टाकून आपले फॉलोवर्स वाढवण्यावर भर देतात. मात्र सई नेहमीच काही तरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात असते. सईची एक बोल्ड मुव्ह म्हणायला हरकत नाही.पण एक मात्र नक्की सईच्या ह्या निर्णयाने आता तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला असेल. एक महिन्यानंतर आता सई सोशल मीडियावर परतताना काही नवी सरप्राइजेस घेऊन येणार का? ह्याची आता तिचे चाहते वाट पाहत आहेत.