Home मनोरंजन सलमान खान करतो अवैध सावकारीचा धंदा, दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

सलमान खान करतो अवैध सावकारीचा धंदा, दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

0

‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी पुन्हा एकदा सलमान खान आणि कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.अभिनव यांनी फेसबुक पोस्टद्वारे सलमान खान याच्या ‘Being Human’ संस्थेवर गंभीर आरोप केले असून सरकारकडे या संस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘Being Human’ संस्था ही सलीम खान यांची आयडिया आहे. या संस्थेची चॅरिटी फक्त दिखावा आहे. ‘दबंग’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना मी सर्व पाहिले होते. या संस्थेद्वारे 5 सायकलीचे वाटप केले जायचे आणि पुढच्या दिवशी वृत्तपत्रात ‘दानशूर सलमान खानने गरिबांना 50प सायकलींचे वाटप केले’, असे छापून यायचे. सलमान खान यांच्या गुंड, मवाली इमेजला सुधारण्यासाठी हे सर्व केले जायचे. गुन्हेगारी प्रकरणामध्ये मीडिया आणि न्यायालयाकडून त्याला थोडी सहानुभूती मिळावी यासाठी हे सर्व केले जाते, असा आरोपही अभिनव यांनी केला.

दबंग च्या शूटिंगच्या वेळी माझ्या डोळ्यासमोर केवळ ५ सायकली वाटल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ५०० सायकली वाटल्याचे छापून आले. हे सगळे सलमान खानची मवाली, गुंड ही प्रतिमा सुधारण्यासाठी करण्यात आले कारण कोर्टातील गुन्हेगारीच्या केसेस मध्ये माध्यमे आणि न्यायाधीश थोडीशी दया दाखवतील असा यामागचा उद्देश असल्याचे’ त्यांनी लिहिले आहे. आज ही संस्था ५०० रुपयांची जीन्स ५००० रुपयांना विकते. तसंच या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो. असेही त्यांचे म्हणणे आहे.

अभिनेता सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझं करिअर संपवलं, असे धक्कादायक आरोप दिग्दर्शक अभिनव कश्यपने मंगळवारी केले. फेसबुकव र भलीमोठी पोस्ट लिहित अभिनवने त्याच्या मनातील खदखद बोलून दाखवली. अभिनवची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अभिनवने यापूर्वी केलेल्या आरोपांवर सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली होती.