Home मनोरंजन ‘तान्हाजी’च्या ट्रेलर मधील “या” दृष्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप : मागितला खुलासा

‘तान्हाजी’च्या ट्रेलर मधील “या” दृष्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप : मागितला खुलासा

0

प्राईम नेटवर्क : अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तान्हाजी मालुसरे यांनी गाजवलेल्या पराक्रमावर आधारित हा चित्रपटा आहे.

प्रेक्षकांनी या ट्रेलरच तोंड भरून कौतुक केलं मात्र संभाजी ब्रिगेड या संघटनेने मात्र ट्रेलर मधील काही सिन बाबत आपला आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांच्या मते “ऐतिहासिक विषयावर चिञपट तयार करायला हवे, परंतु चित्रपटाच्या नावाखाली ऐतिहासिक प्रसंगाचे किंवा व्यक्तींचे विकृतीकरण करण्याच्या प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.”

संभाजी ब्रिगेडने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मधील पुढील दृष्यांवर आक्षेप व्याकत केला व खुलासा देखील मागितला आहे. 

◾ ट्रेलर मध्ये छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण दाखवला आहे ?
◾ अभिनेञी काजोलच्या तोंडी जे संवाद आहेत. त्यावरुन छञपती शिवरायांची अनऐतिहासिक अशी गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी परत जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
◾३) छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर ॐ दाखवून, छञपती शिवरायांची सर्वधर्म समावेशक प्रतिमा पुसून छञपतींचे हिंदुपतपादशाह अशी धार्मिक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

असे काही आक्षेप संभाजी ब्रिगेड या संघटनेने सदर चित्रपटाबाबत व्यक्त केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी याबाबत निर्माता अजय देवगन व दिग्दर्शक ओम राउतकडे खुलासा देखील मागितला आहे. यावर आता पुढे काय होणार हे वेळच सांगेल.