Home मनोरंजन बॉलिवूडवर अजून एक शोककळा, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे निधन

बॉलिवूडवर अजून एक शोककळा, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे निधन

0

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तर बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केलेल्या आणि सर्वपरिचित सरोज खान यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना मागील आठवड्यापासून श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत स्थिर होती असे सांगितले जात आहे, मात्र आज सकाळी हृदयविकाराच्या त्रिव झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सरोज खान ह्या १९८३ मध्ये हिरो चित्रपटापासून बॉलिवूड मध्ये कार्यरत आहेत, त्यांनी अगदी मागच्या वर्षीपर्यंत चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध गाण्यांचे नृत्य रचना करून दिगदर्शन केले आहे यामध्ये हवा हवाई, चोली के पिछे क्या है, निंबुडा निंबुडा या सारख्या सुपरहिट गाण्यांचा समावेश होतो.

सबंध बॉलिवूड सरोज खान यांना सोशल मीडियावर आदरांजली देत आहे. सकाळी उठल्या उठल्या ह्या दुःखद घटनेने अनेकांना झटका बसला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहत म्हटले की, ” २०००० पेक्षा जास्त सदाबहार गाण्यांचे नृत्य दिगदर्शक करणाऱ्या सरोज खान यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या सर्व चाहत्यांच्या दुःखात मी शामिल आहे”.