Home मनोरंजन भांग पिऊन शिल्पा शेट्टीचा नागीण डान्स!

भांग पिऊन शिल्पा शेट्टीचा नागीण डान्स!

0


देशभरात आज होळीचा सण मोठ्या आनंदात साजरा होत आहे. होळी म्हटले की भांग आलाचं! देशभरात अनेक ठिकाणी होळीच्या निमित्ताने भांगेचे सेवन केले जाते. भांगेचे प्राशन केल्यानंतर नशा चढते, आणि या नशेच्या धुंदीत लोक चित्रविचित्र प्रकारे नाचायला सुरवात करतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या सोबत झाला आहे. भांगेच्या नशेत ‘नागिन डान्स’ करणाऱ्या शिल्पाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरादार व्हायरल होत आहे.


हा व्हिडिओ शिल्पाच्या पती म्हणजे राज कुंद्रा यांनी सोशल मीडिया वर टाकला असून त्याने त्यामध्ये, ” दो घुट भांग का इफेक्ट” असे स्टेटस सुद्धा ठेवले, नेटकाऱ्यांमध्ये या विडिओ ने धुमाकूळ घातला असून याला प्रचंड लाईक आणि कमेंट्स मिळत आहेत. शिल्पा ही हनी सिंह च्या नागीण गाण्यावर नागीण बनून डोलताना या व्हिडिओत दिसंत आहे.