Home मनोरंजन धक्कादायक : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सेजल शर्माने केली आत्महत्या!

धक्कादायक : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सेजल शर्माने केली आत्महत्या!

0

अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्ये नंतर आता छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. प्लसवरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ मालिकेतील मुख्य अभिनेता अंशच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सेजल शर्माने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली आहे. सामनाच्या एका रिपोर्ट नुसार सेजलने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह तिच्या मीरा रोड येथील फ्लॅटमध्ये आढळून आल्याची माहिती मिळत आहे.

सेजलने एका स्मार्टफोनच्या जाहिरातीत आमीर खानसोबत व उषा फॅनच्या जाहिरातीत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत देखील काम केले होते. मिळालेल्या माहिती नुसार सेजलने भरपूर जाहिराती केल्या व बऱ्याच कामांच्या ऑफर्स तिच्याकडे होत्या. या प्रकरणा संधार्भात पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.