Home मनोरंजन सोनू सूद ने वाढदिवसानिमित्त परराज्यातील मजुरांना दिले मोठे गिफ्ट!

सोनू सूद ने वाढदिवसानिमित्त परराज्यातील मजुरांना दिले मोठे गिफ्ट!

0

बॉलिवूड कलाकार सोनू सूद बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी सोनू सुदने बरीच मदत केली. आता लॉकडाऊन शिथिल होत असल्याने परराज्यातील मजुरांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हे लक्षात घेऊन सोनू सुदने या मजुरांच्या रोजगारासाठी एक ऍप बनवले आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विट करून त्याने ही माहिती कळवली.

सोनू सुदचे ट्विट पुढीलप्रमाणे:

या ट्विटमध्ये सोनू सूद म्हणाला की त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवासी बांधवांसाठी त्याने PravasiRojgar.com सोबत ३ वर्षांचा करार केला आहे. येथे काम करणाऱ्यांना उत्तम पगार, PF, ESI अशा सुविधा मिळतील. तसेच या ट्विट मध्ये सोनू सुदने नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी AEPC, CITI, Trident, Amazon, Quess Corp, Sodexo, Urban Co. , Portea व इतर अनेक कंपन्यांचे आभार मानले आहेत.