मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे सक्रिय असतो. परंतु आपले ट्विटरवरील अकाउंट तो आता डिलीट करीत आहे. आजच सुबोधने स्वतः ट्विट करून याबद्दल सांगितले. त्यामुळे हा निर्णय अचानक घेण्यामागे काय कारण असेल असा प्रश्न त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.
लोकमतच्या मीडिया रिपोर्टवरून सुबोधने ट्विटरवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या नकारात्मकतेला कंटाळून ट्विटर अकाउंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मात्र हे अजून स्पष्ट झालेले नाही. याबद्दल सांगतांना आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये सुबोध भावे म्हणाले, “आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा!” या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. तसेच काही चाहते अकाउंट डिलीट करण्याचा निर्णय योग्य नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.