Home अर्थजगत हात, पाय, आवाज, अगदी केसांचा सुद्धा विमा काढलाय या सेलिब्रेटींनी, पाहून थक्क...

हात, पाय, आवाज, अगदी केसांचा सुद्धा विमा काढलाय या सेलिब्रेटींनी, पाहून थक्क व्हाल

0

विमा म्हटलं की आपल्याला ते कंटाळवाणे एजंट्स आठवतात जे सारखे निरनिराळ्या विमा सुविधांची लिस्ट सांगत ‘एक तरी पॉलिसी काढा’ असे म्हणत मागे लागलेले असतात. कसं बसं करून काही लोक या असहाय्य वाटणाऱ्या विमा अधिकार्यांना थाप मारून कटवतात. काही लोक वेळेची गरज समजून विमा करूनही घेतात. पण तुम्हाला माहित आहे का काही सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी साधारण विम्यासह आपल्या शरीराच्या निरनिराळ्या अंगांचाही विमा काढलेला आहे. उदाहरणार्थ हाताचा, पायांचा अगदी आवाजाचा सुद्धा! विश्वास नाही बसत ना ? तुम्ही स्वतःच पहा कुठल्या सेलिब्रिटीने आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टीचा विमा काढून ठेवला आहे..

लता मंगेशकर : महाराष्ट्राच्या गाणकोकिळा लता मंगेशकर अर्थात आपल्या लाडक्या लतादिदींनी त्यांच्या आवाजाचा इंश्युरंस करून घेतला आहे. आता तुम्ही म्हणाल की लता दिदींना आवाजाचा इंश्युरंस का हवा? आणि त्यांना पैशांची काय गरज? तर मित्रांनो लतादिदींनी हा विमा स्वतःसाठी नाही तर आपल्या सोबत काम करणाऱ्यांच्या हितासाठी केला आहे. त्यांच्या डायरेक्टर अथवा प्रोड्यूसरला कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये या हेतूने त्यांनी हा विमा केला आहे.

सानिया मिर्झा : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आपल्या हातांचा इंश्युरंस केला आहे. एक खेळाडू या नात्याने तिला रोज मैदानात उतरून जीव जोखमीत घालून खेळावं लागतं. कधी काय दुखापत होईल याची खात्री नसते. अशात तिला हा इंश्युरंस करणं गरजेचं होतं.

अमिताभ बच्चन : बॉलीवूडचे शेहेन्शः बिग बी अमिताभ बचन यांची एक उत्तम कलाकार म्हणून जगभरात ओळख आहेच; सोबतच त्यांच्या आवाजाचे ही लोक दिवाने आहेत. याच आपल्या आगळ्यावेगळ्या आवाजाच्या बळावर त्यांनी आज शेकडो ब्रँड्सला ब्रँड अंबेसिडर बनून नवी ओळख दिली आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या आवाजाचा विमा केला आहे. केवळ विमाच नाही तर त्यांनी त्यांच्या आवाजाचा कॉपीराईटही करून घेतला आहे जेणेकरून अनधिकृतपणे त्यांचा आवाज त्यांच्या परवानगी शिवाय कुणीच वापरू शकणार नाही.

या दिग्गज सेलिब्रिटींसह असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्या विविध अंगांचा विमा केला आहे. जसे रजनीकांत यांनी आपल्या आवाजाचा विमा आणि कॉपीराईट केलं आहे, डेविड बॅकहम या इंग्लंडच्या फुटबॉलरने आपल्या पायांचा विमा केला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हेड अँड शोल्डर या शॅम्पूच्या ब्रँडने Troy Polamalu या अमेरिकन खेळाडूच्या ३ फुट लांब आणि मजबूत केसांचा १ मिलियन डॉलर रुपयांचा विमा केला आहे. त्याच बरोबर नेहा धुपियाला तिच्या फिगरसाठी आणि जॉन इब्राहिमला त्याच्या buts चा विमा काढण्याची ऑफर एकाच कंपनीने दिली होती पण त्याचं पुढे काही होऊ शकलं नाही.

तर सांगायचा हेतू हाच की इंश्युरंस आणि सामान्य विम्यासह अशा शरीराच्या विविध अंगांचा ही विमा काढता येतो आणि सेलिब्रिटी कलाकारांना व खेळाडूंना त्यांच्या व त्यांच्या सहकार्यांच्या हितार्थ असे इंश्युरंस करावे लागतात.