बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील घरी गळफास लावून आत्महत्या केली आणि एकचं खळबळ उडाली. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील बोलण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. सुशांतचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ नुसार सुशांत आत्महत्येच्या दिवशी सकाळी प्लेस्टेशन वर गेम खेळत होता, एवढ्या चांगल्या पद्धतीने गेम खेळणारा माणूस आत्महत्या कसा करू शकतो.
या व्हिडीओमध्ये दावा करण्यात येणारा प्लेस्टेशन आयडी खरोखर सुशांतचा आहे का, याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचे असे म्हणणे आहे की सुशांतच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. ज्यामध्ये या दाव्यांचा खुलासा होईल. मात्र सुशांतच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि त्याबरोबर सुशांतचा खून करण्यात आला असा आरोप त्याचे चाहते करत आहेत.
सुशांतच्या ट्विटर अकाऊंट वर सुदधा शंका घेतली जात आहे, त्याच्या काही पोस्ट डिलिट केल्या आहेत असे पोलिसांचे म्हणणें आहे,पोलिसांनी ट्विटर ला पत्र लिहिले आहे, या पत्राद्वारे पोलिसांनी सुशांतच्या गेल्या ६ महिन्यांच्या ट्विटर पोस्टची माहिती मागवली आहे. सुशांतच्या ट्विटर अकाऊंटवरून २७ डिसेंबर २०१९ ला शेवटचं ट्विट केल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतरच्या काही पोस्ट डिलीट केल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतेय. यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी ट्विटरला पत्र पाठवलंय. सुशांत आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत २२ जणांची चौकशी करण्यात आली आहे.