Home मनोरंजन सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंड चे धक्कादायक खुलासे, आत्महत्या का केल्याचा पुरावा!

सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंड चे धक्कादायक खुलासे, आत्महत्या का केल्याचा पुरावा!

0

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केस प्रकरणी मुंबई पोलीस आता सुशांतच्या जवळच्या लोकांची चौकशी करत आहेत. डायरेक्टर मुकेश छाबडानंतर आता पोलिसांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला गुरुवारी बांद्र्याच्या पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. रिपोर्ट्सनुसार रियाची तब्बल १० तास चौकशी झाली आहे. यावेळी रियाच्या फोनमधील फोटो आणि व्हिडीओ यांचीही तपासणी झाली.

पोलीस चौकशी करत असताना रियानं सांगितलं की, ते २०२० च्या शेवटी लग्न करणार होते. सोबत ते प्रॉपर्टीदेखील खरेदी करणार होते. एका ब्रोकरच्या हवाल्यानं या संदर्भात बातम्याही आल्या होत्या.

रिया सुशांत सोबत एकाच फ्लॅटमध्ये रहात होती. सुशांतनं मित्रासोबत मिळून हा फ्लॅट रेंटवर घेतला होता. सुशांतच्या निधनाच्या काही दिवस आधीच रिया फ्लॅट सोडून गेली होती. पोलिसांनी रियाला ब्रेकअपबद्दलही विचारलं आहे. रियानं पोलिसांनी सुशांतसोबत एक्सचेंज झालेले मेसेजही दाखवले आहेत. सुसाईडच्या आधी शनिवारी सुशांतनं शेवटचा कॉल रियाला केला होता. रियानं डिप्रेशन बद्दल बोलताना सांगितलं की, निरोगी राहण्यासाठी सुशांतनं योगा आणि मेडिटेशन सुरू केलं होतं. सुशांत अनेकदा अपसेट होत असे. खूपदा औषधं घेण्यासाठीही तो नकार देत असे.

रियानं त्याला खूप समजावलं परंतु काहीच फायदा झाला नाही. रियानं जेव्हा जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याची अवस्था पाहून त्याच्या बहिणीला सोबत राहण्यासाठी सांगितलं होतं. रियानं सुशांतच्या सिनेमा आणि प्रोजेक्ट्सबद्दलही सांगितलं की, दोघेही रूमी जाफरीच्या सिनेमात काम करणार होते. कोरोनामुळं याला विलंब झाला. सुशांतकडे अनेक प्रोजेक्ट्स होते आणि काही प्रोजेक्ट्सवर त्याचं बोलणं सुरू होतं. सुशांत जे प्रोजेक्ट फायनल करणार होता त्यानंतर त्याची डेट डायरी फुल होणार होती. रियानं सर्व काही सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे. कुटुंबीय आणि दोस्तांसोबत सुशांतचं रिलेशन कसं होतं यावरही रियानं भाष्य केलं आहे. रियानं सांगितलं की, त्याच्या फ्लॅट पार्टनरवरून सुशांतसोबत थोडा वाद झाला होता. रियानं असंही सांगितलं की, तिनं सुशांतच्या अंत्य संस्कारात सहभागी व्हावं असं कुटुंबीयांना वाटत नव्हतं.