Home मनोरंजन अभिनेत्री चा मोठा खुलासा; केकेआर च्या पार्टीत केलं जातं ड्रग्सचं सेवन. एनसीबीला...

अभिनेत्री चा मोठा खुलासा; केकेआर च्या पार्टीत केलं जातं ड्रग्सचं सेवन. एनसीबीला दिली जातील नावे!

0

एनसीबीने बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स जरी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. अभिनेत्री शर्लिन शोप्राने धक्कादायक खुलासा केला आहे त्यामध्ये ती बोलली की, “कोलकाता नाइट रायडर्सच्या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं जातं. या पार्ट्यांमध्ये स्टार्स व क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्सचं सेवन करतात, किंग खान कसा आहे हे सर्वांना माहित आहे,” तसेच, ड्रग सेवन करणाऱ्या सगळ्यांची नावे ती एनसीबी ला सोपवेल अस बोलली.

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत शर्लिनने शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि क्वान कंपनीच्या मालकावरही गंभीर आरोप केले. तसेच, माहिती देतांना ती बोलली की, “मी केकेआरचा सामना पाहण्यासाठी कोलकाताला गेले होते. सामना झाल्यानंतर एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

त्या पार्टीत क्रिकेटर्स, बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्सचं सेवन करत असल्याचं मी स्वत: पाहिलं. क्रिकेटर्सच्या पत्नीसुद्धा ड्रग्सचं सेवन करतात”, असं ती म्हणाली.पुढे तिने असही सांगितलं की, “दीपिकाला ‘माल’ न मिळाल्याने ती नैराश्यात गेली. क्वान कंपनीचा मालक हा अत्यंत वाईट माणूस आहे. त्याने माझ्याशी गैरवर्तणूक केली”, असे आरोप शर्लिनने या मुलाखतीत केले.