Home महाराष्ट्र पुणे ‘सविता भाभी… तू इथेच थांब’ पुण्यातील त्या पोस्टरचे रहस्य उलगडले!

‘सविता भाभी… तू इथेच थांब’ पुण्यातील त्या पोस्टरचे रहस्य उलगडले!

0

आजकाल सिनेमांच्या, सिरियल्सच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट्स वापरले जातात. काही वेळा अशा गोष्टींचा अर्थ लवकर उघड होत नाही व त्या चर्चेचे कारण बनतात. पुण्यात नुकतीच अशाच स्वरूपाची एक गोष्ट घडली. कालपासून पुण्यातील चौकांमध्ये ‘सविता भाभी… तू इथेच थांब’ असे लिहिलेले पोस्टर दिसत आहे. या पोस्टरमधील सविता भाभी कोण असेल या उत्सुकतेमुळे हे पोस्टर चर्चेचे कारण बनले होते. ‘पुढारी’च्या मीडिया न्यूजनुसार या पोस्टरचे रहस्य आता उलगडले असून सविता भाभी हे एका आगामी मराठी चित्रपटातील कॅरेक्टरचे नाव असून या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी हे पोस्टर्स लावले गेले आहेत अशी माहिती समोर आली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार अभिनेता आलोक राजवाडे याच्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी सदर पोस्टर लावण्यात आले आहे. याबद्दलची माहिती अभिनेत्री सई ताम्हणकरने एका व्हिडीओ मधून दिली आहे. या व्हिडिओमध्ये तिचा फक्त आवाज ऐकायला येत असून ती म्हणते आहे की, “मी सविता, जी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त माहितीये पण तिला तुम्ही कधीच बघितलेलं नाही.”

 तसेच या चित्रपटाचे पोस्टर सईने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केले असून ६ मार्चला ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहिती दिली. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिका साकारतांना दिसणार असून धर्मकीर्ती सुमंत, अभिनेत्री पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.