Home मनोरंजन “लग्नाच्या पहिल्या रात्री माझा सौदा झाला होता!”, करिश्मा कपूर चे धक्कादायक आरोप

“लग्नाच्या पहिल्या रात्री माझा सौदा झाला होता!”, करिश्मा कपूर चे धक्कादायक आरोप

0

बॉलीवूड मधील एकेकाळी प्रचंड यश मिळवणारी करिश्मा कपूर हिच्या विवाहित जीवनात प्रचंड उलथापालथ झालेली आहे अशातच आता तिने तिच्या घटस्फोटित पतीवर गंभीर असे आरोप केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या सिनेमापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच सक्रिय असते. करिश्मा लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर झाली मात्र त्यापूर्वी तिनं अनेक रोमँटिक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले होते. मात्र तिच्या रियल लाइफ लव्ह स्टोरीचं मात्र हॅप्पी एंडिंग होऊ शकलं नाही.

‘हां मैंने भी प्यार किया’ या सिनेमा झाला आणि तिचा साखरपुडा हा बच्चन कुटुंबात अभिषेक बच्चनसोबत झाला होता त्यावेळी करिश्मा तसेच संपूर्ण कपूर कुटुंब खूप खूश होती. बच्चन कुटुंबानं भव्य कार्यक्रमात करिश्माचं आपल्या कुटुंबात स्वागत केलं होतं. मात्र काही दिवसांनंतर त्यांचं नातं तुटलं आणि अभिषेक-करिश्माचे रस्ते वेगवेगळे झाले.

हा प्रकार झाल्यानंतर प्रख्यात उद्योगपती संजय कपूर यांच्याशी झालं मात्र ७ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. यावेळी संजीव कपूर यांनी करिश्मा वर पैशासाठी लग्न केल्याचा आरोप ठेवला होता, यानंतर बरेच दिवस हे प्रकरण न्यायालयात सुरू होते.
एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले तसेच करिश्माने तिच्यावर मानसिक अत्याचार होत असल्याचे सांगितले होते.

आता करिश्मानं संजयवर अतिशय गंभीर आरोप लावला आहे तिच्यानुसार हनीमूनच्या रात्रीच त्यानं माझा सौदा केला होता असा आरोप लावला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करिश्मा म्हणाली, त्यानं हनीमूनच्या रात्रीच माझा सौदा केला. त्यानं मला त्याच्या मित्रांसोब एक रात्र घालवण्यास सांगितलं होतं आणि जेव्हा मी असं करण्यास नकार दिला त्यावेळी त्यानं मला मारहाण केली.