Home मनोरंजन या अभिनेत्रीने चुकून शेअर केला आपल्या घराचा पत्ता आणि मग चाहत्यांनी केला...

या अभिनेत्रीने चुकून शेअर केला आपल्या घराचा पत्ता आणि मग चाहत्यांनी केला हा पराक्रम!

0

२०१७ चा मिस वर्ल्ड अवॉर्ड जिंकणारी मानुषी छिल्लर सध्या बरीच चर्चेत आली आहे. ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे हे आपण ऐकलेच असेल. यश राज फिल्म्सच्या आगामी ‘पृथ्वीराज’ या ऐतिहासिक चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारतांना मानुषी दिसणार आहे. तसेच चित्रपटातील मुख्य नायक असलेल्या अक्षय कुमार बरोबर काम करण्याची संधी तिला मिळणार आहे. या बातमीमुळे तिचा चाहतावर्ग अत्यंत आनंदात आहे.

याशिवाय अजून एका बातमीमुळे मानुषी सध्या चर्चेत आली आहे. एका गिफ्टसाठी आभार व्यक्त करतांना त्या गिफ्टचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला; ज्यावर तिच्या घराचा पत्ता लिहिलेला होता. ही गोष्ट लक्षात येताच तिच्या काही जवळच्या व्यक्तींनी तिला ती पोस्ट डिलीट करण्याचा सल्ला दिला. पण तिने पोस्ट डिलीट करण्याआधीच ती व्हायरल झाली होती. बऱ्याच चाहत्यांपर्यंत तिचा पत्ता गेल्यामुळे चाहते उत्साहित झाले आणि अनेकांनी तिच्या पत्त्यावर पुष्पगुच्छ आणि फुले पाठवली. हे पुष्पगुच्छ इतके जास्त होते जणू तिच्या घरासमोर फुलांचा गालिचा पसरला असावा.

चाहत्यांचे तिच्यावरील प्रेम पाहता तिच्या पहिल्या चित्रपटालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असे दिसत आहे.