विशाल-शेखर या सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी याने आज ट्विटर मध्ये मराठीत ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात पहिला जनता कर्फ्यू लावला त्या दिवशी सर्वांना संध्याकाळी टाळ्या थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या त्यावेळी रुग्ण संख्या ही फक्त ५०० होती आज मात्र ती आठ लाख रुग्णांपर्यंत पोहोचल्याने विशाल ने हे ट्विट केले आहे.
विशाल म्हणतो, ” शेठ, देशात 500 कोरोना पेशंट होते तेव्हा टाळ्या थाळ्या वाजवल्या आता आठ लाख झाले आहेत मग आता DJ वाजवून बघूया का”.
या ट्विट नंतर अनेकांनी विशाल च्या ट्विट ला समर्थन केले मात्र बऱ्यापैकी लोक हे त्याला विरोध करणारे सुदधा आहेत. विरोध करणाऱ्यांच्या मते, “टाळ्या थाळ्या कुणासाठी वाजवल्या गेल्या याची माहिती विशाल च्या मेंदूपर्यंत पोहोचली नाही असे दिसते, अनेक देशांनी या टाळ्या थाळ्यांचे कौतुक केले आहे”
अनेक दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे अशातच सिनेमांची कामे सुद्धा सुरू होण्यास हळू हळू सुरवात झाली आहे, इतर अनेक सेलिब्रेटींसारखाच नेहमी ग्लॅमर आणि लाईम लाईट मध्ये राहणाऱ्या विशालला चर्चेत राहण्याची हुक्की आली असावी असा तर्क सुद्धा या ट्विट मधून निघतो, नाहीतर एरव्ही फाडफाड इंग्रजीत ट्विट करणारा विशाल अचानक मराठीत कसा काय लिहू लागला! बॉलीवूड आणि मराठीचे तसे घनिष्ठ नाते असले तरी सेलिब्रिटी लोक हे चर्चेत राहण्यासाठी मराठीचा वापर करणे हे काही आपल्याला नवीन नाही!