Home मनोरंजन बॉलिवूडचे तीन खान सुशांत सिंह वर गप्प का, यांच्या दुबईच्या प्रॉपर्टी ताब्यात...

बॉलिवूडचे तीन खान सुशांत सिंह वर गप्प का, यांच्या दुबईच्या प्रॉपर्टी ताब्यात घ्या : सुब्रमण्यम स्वामी

0

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्याच्या चाहत्यांनी CBI चौकशी करण्यात यावी यासाठी तगादा लावला आहे, त्यावर आता CBI ने एक वकील नेमून आवश्यक कागदपत्रांची शोधाशोध सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी बॉलीवूड चे तीन खान हे सुशांतच्या आत्महत्येशी निगडित असल्याचे सांगितले आहे, हे तिन्ही खान आत्महत्या प्रकरणामध्ये शांत का आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला.

“बॉलीवूड चे तीन दिगग्ज खान सलमान, अमीर आणि शाहरुख हे सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात शांत का आहेत?” असे ट्विट केल्यानंतर त्यांनी लगेच दुसरे ट्विट करत लिहिले की, ” बॉलीवूड चे हे तीन खान दुबई मध्ये कुणाच्या भरवश्यावर एवढ्या प्रॉपर्टी घेऊन बसलेत, CBI आणि आयकर विभागाने छापे टाकून इथे झडती घ्यायला हवी, नक्कीच काहीतरी धागेदोरे सापडतील.”

दरम्यान मुंबई पोलिसांनी सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात ३५ लोकांचे जवाब नोंदवले असून त्यातून कुठलाही सुगावा लागत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याच्या आत्महत्यावरून नानाविध तर्क लोक लावत असून यात शेखर सुमन सारख्या अभिनेत्यांनी सरळ सरळ खुनाचा आरोप लावला आहे. घराणेशाहीला जबाबदार धरत लोकांनी अनेक starkids celebrity यांना अक्षरशः रडायला लावलं आहे. काहींनी तर चक्क ट्विटर आणि इतर सोशल मीडिया बंद केले आहेत.