Home अर्थजगत अर्जुन कपूर मुळे येस बँक बुडाली!! काय आहे भानगड?

अर्जुन कपूर मुळे येस बँक बुडाली!! काय आहे भानगड?

0

भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचा एनपीए मर्यादे बाहेर वाढल्याने येस बँकेवर निर्बंध लादले, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. लाखो ग्राहक चिंतेत आहेत. याला जबाबदार कोण?? तर मलायका अरोराचा नवाकोरा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर! आश्चर्य वाटले ना? अर्थात हे आमचे मत नाही, तर कमाल आर खान अर्थात केआरकेचे मत आहे. होय, येस बँक बुडाल्याचे खापर केआरकेने अभिनेता अर्जुन कपूरच्या डोक्यावर फोडले आहे.

येस बँकेशी अर्जुनचा संबध लावून केआरकेने अर्जुन कपूरला जोरदार टोला लगावला आहे. नेहमी वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणा-या केआरकेने पुन्हा एकदा एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने अर्जुन कपूरला टार्गेट केले.

“अर्जुन कपूरने आतापर्यंत ज्या काही सिनेमात काम केले ते सर्व सिनेमे जवळपास बुडाले आहेत. त्याचा ‘2 स्टेट’ हा चित्रपट मात्र सुपरहिट ठरला, या चित्रपटात अर्जुन येस बँकेत काम करत असल्याचे दाखवण्यात आले होते आणि आता तर येस बँकच बुडालीय” असे केआरकेचे म्हणणे आहे.
अर्जुन कपूरने या ट्विट बद्दल काहीच प्रतिक्रिया सद्यातरी दिली नाही. केआरकेच्या सदैव ट्रेंडिंग राहायच्या क्लूप्त्यांपैकी एक त्याने यावेळी अर्जुन कपूर वर वापरली हे नक्कीच.