Home अर्थजगत देशाच्या ८० करोड नागरिकांना मिळणार २ रुपये किलोने गहू तर ३ रुपये...

देशाच्या ८० करोड नागरिकांना मिळणार २ रुपये किलोने गहू तर ३ रुपये किलोने तांदूळ: प्रकाश जावडेकर

0

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात तर आली मात्र, घरातून बाहेर न पडल्यास घरात पैसे कुठून येणार असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या गरिब, होतकरु कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने देशातील ८० कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती २७ किलो रुपयांचे गहू अवघ्या २ रुपयांना आणि प्रती किलो ३४ रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त ३ रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ह्या बैठकीनंतर प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्वाना या बाबतीत अधिकृत माहिती दिली. सर्व राज्य सरकारांना ३ महिन्यांचे ऍडव्हान्स अन्नधान्य घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचा प्रादूर्भाव यापुढे वाढू नये यासाठी सरकारने देशातील जनतेला घराबाहेर अजिबात न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा सरकारने दिली आहे. याशिवाय सर्व जीवनाश्यक सेवा पूर्णपणे सुरु असून किराणा, रेशनचे दुकान सुरु असणार आहेत’, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

‘कोरोनापासून वाचायचं असेल तर २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा उपाय महत्त्वाचा आहे. हा लॉकडाऊन आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वांनी पुढचे २१ दिवस घरात राहा, दिवसात १५ ते २० वेळा हात धुवावे, ताप, खोकला आणि सर्दी झालं तर तातडीने रुग्णालयात जावे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावे’ असं आवाहन जावडेकर यांनी केलं.