प्रवासी वाहतुकी मधील दिग्गज कंपनी Uber हिने काल व्हिडिओ कॉल करत ३५०० लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले. ” लॉकडाऊन मुळे झालेल्या परिणामांमुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत की आज तुमच्या कामाचा शेवटचा दिवस आहे” असे बोलून क्षणार्धात हजारो लोकांचा रोजगार हिसकावून घेतला जात आहे.
खाद्यपदार्थ पुरवठा सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी Zomato हिने सुद्धा तिच्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यांनी त्यांच्या कर्मचार्यांपैकी १३% कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, काल ५२० लोकांना काढून टाकण्यात आले.
लॉकडाऊन चा परिणाम हा बांधकाम क्षेत्राला सुद्धा झाला असून आधीच हवालदिल झालेल्या या व्यवसायाला आता कोरोणाची बाधा झाली आहे. परराज्यांतून येणाऱ्या मजुरांवर चालत असलेले हे क्षेत्र ओसाड पडले असून, कोरोना लॉकडाउन आणि त्यावर मजुरांची कमतरता यामुळे या कंपन्यांवर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची पाळी येत आहे. बांधकाम क्षेत्रातील मोठी कंपनी लोढा डेव्हलपर यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. यांच्या कर्मचारी कपातीचा आवाका एवढा मोठा आहे की मोठ्या पगारांवरील कर्मचार्यांसोबतच नुकत्याच कॉलेज कॅम्पस मधून करारनाम्यातून घेतलेल्या इंजिनीअरिंग विध्यार्थ्यांना सुद्धा काढून टाकत आहेत.
एकीकडे कोरोना सारखी परिस्तिथी आणि दुसरीकडे अर्थव्यवस्था मोडकळीस निघालेली, यातून आता कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टी मुळे नाईलाजस्तव परिस्तिथीचा सामना करावा लागत आहे. आता आम्हाला नोकऱ्या कोण देणार हा विचार एकीकडे आणि जर अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबातील कुणाला कोरोना झाल्यास कसे होणार हा विचार यामुळे माणसांचे आयुष्य कोरोनामुळे किती अस्ताव्यस्त झाले आहे हे लक्षात येईल.