Home अर्थजगत …आणि १३००कोटी झाले लॉक!

…आणि १३००कोटी झाले लॉक!

0

“मरताना काय पैसे वर घेऊन जाणार आहेस का?” असे आपण सर्रास ऐकतो,बोलतोही ! अशीच एक घटना घडलेय ३० वर्षीय गेराल्ड कॉटन बाबतीत.

कॅनडामधील क्रीप्टोकरन्सी कंपनी क्वाड्रीगासीएक्सचे ३० वर्षीय सीईओ गेराल्ड कॉटन भारत दौऱ्यावर आले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे १ नाही २ नाही तर तब्बल १३०० कोटी रुपये लॉक झाले आहेत कारण क्रिप्टोकरंसी लॉकचा पासवर्ड फक्त त्यांनाच माहिती होता. इतकेच काय तर चक्क त्यांच्या पत्नीला देखील पासवर्ड माहिती नाही.

“शिवाजी-द बॉस” चित्रपट आठवतो का? राजनिकांतचे गूढ शोधण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही उपयोग होत नाही, तसेच काहीसे येथील एक्स्पर्ट हॅकर्सच्या बाबतीत झाले पण त्यांच्या पदरीही निराशाच आली. गेरॉल्ड यांचे इन्क्रीप्टिड अकाऊंट असल्याने ते अनलॉक करणे अशक्य आहे.

अनाथ मुलांसाठी अनाथाश्रमाची स्थापना करण्याच्या दृष्टीने गेराल्ड भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या पोटाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. बिटकॉइन स्वीकारून प्रत्यक्ष पैसे देण्याचे काम कॉटन करत असत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना डिपॉझिटच्या हिशोबाप्रमाणे ग्राहकांना पैसे द्यायचे आहेत पण अकाऊंट लॉक असल्याने त्यांना असे करणे अशक्य आहे.