Home अर्थजगत दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, पोस्ट ऑफिस मध्ये भरती: १९९०० रुपये पगार…

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, पोस्ट ऑफिस मध्ये भरती: १९९०० रुपये पगार…

0

भारतीय डाक विभागाने नुकतेच दहावी पास उमेदवारांना भरतीचे निमंत्रण दिले आहे अर्थात भरती प्रक्रिया सुरु केली आहे. स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी एकूण १० उमेदवारांची ही भरती असणार आहे. या पदासाठी तुम्ही पत्र असाल तर तारीख १३ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करू शकता. या भरतीसाठी तुमचे वय किमान १८ ते जास्तीत जास्त २७ वर्ष असणे आवश्यक आहे. मात्र यात एससी, एसटी उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट राहील. परीक्षा फी केवळ १०० रुपये असून वाहन चालवण्याच्या कौशल्याच्या बळावर उमेदवाराची निवड होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना दर महा १९,९०० रुपये वेतन मिळेल.

भरतीसाठी आवश्यक योग्यता पुढील प्रमाणे:

  • तुम्ही मान्यता पात्र संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • तुमच्याकडे लहान व मोठी अर्थात हलकी आणि जड वाहने चालवण्याचा परवाना असायला हवा.
  • शेवटचं म्हणजे तुम्हाला मोटर मेकॅनिजमची माहिती असायला हवी व वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.

अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया प्रक्रिया पुढील प्रमाणे:

उमेदवारांना https://www.indiapost.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येईल. अर्ज करुन संबंधित आवश्यक त्या फोटोकॉपी जोडाव्या लागतील. सदर अर्ज एका लिफाफ्यात व्यवस्थित पाक करून डाकच्या माध्यमातून “मॅनेजर, मेल मोटर सर्विस, जीपीओ कॅम्पस, पटना – ८००००१” या पत्यावर १३ नोव्हेंबर २०१९ च्या आधी पाठवावा.

सविस्तर माहितीसाठी https://www.indiapost.gov.in या भारतीय डाकच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.