Home अर्थजगत “सरकार निर्लज्ज आहे” : अर्थसंकल्पावरून भडकले जिग्नेश मेवाणी

“सरकार निर्लज्ज आहे” : अर्थसंकल्पावरून भडकले जिग्नेश मेवाणी

0

आज अर्थात शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसी व आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग खासगी कंपन्यांना विकण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती दिली. लोकमताच्या एकारिपोर्ट नुसार परिणामी आता एलआयसीला खासगीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसत आहे. यावरून आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली आहे.

एलआयसी व आयडीबीआय बँकेतला हिस्सा विकण्याचा प्रस्ताव सरकारसमोर असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली असता जिग्नेश मेवाणी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून भाजपा सरकारवर निशाणा साधला. “रेल्वेचं खासगीकरण केलं, एअर इंडियाचं खासगीकरण केलं, आणि आता एलआयसीचं देखील खासगीकरण केलं… देशातील गरीब व मध्यमवर्गीयांची जबाबदारी सरकार झटकून लावत आहे; यांना लाज राहिली नाही. पुढील काही दिवस या सरकारची वस्तुस्थिती सर्वांना कळेलच” असा सणसणीत टोला जिग्नेश मेवाणी यांनी दिला आहे.