Home अर्थजगत उत्सवांच्या तोंडावर सर्वसामान्यांसाठी शासनाची नियमावली…

उत्सवांच्या तोंडावर सर्वसामान्यांसाठी शासनाची नियमावली…

0

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार येत्या १ ऑक्टोबर पासून सरकारी सेवांशी निगडित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत असे समजले. बँकिंग सुविधा, घरगुती गॅस सेवा, कर्जव्यवस्था अशा अनेक सुविधा स्वस्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑक्टोबर पासून बदलण्यात येणार असलेले नियम खालीलप्रमाणे:
◆ स्टेट बँक ऑफ इंडियाने मिनिमम बॅलन्स संबंधातील काही नियमांत बदल केले असून त्यापाठोपाठ गृह कर्ज, व्यक्तिगत कर्ज, वाहन कर्ज यांच्यावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.


◆ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या संबंधातील नियमही बदलण्यात येणार आहेत. कर्मचारी सेवेत असतांना मृत्यू ओढवल्यास त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनचा दर वाढणार आहे.


◆ घरगुती गॅसच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.


◆ ड्रायव्हिंग लायसन्स तसेच वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मध्ये चिप आणि क्यूआर कोड टाकण्यात येणार आहेत. यामुळे वाहन चालकांचे आणि वाहनांचे सर्व डिटेल्स एकाच जागी साठवल्या जाणार आहेत.