राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती बाबत भाष्य केले आहे त्यांच्यानुसार, ” पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती ह्या राज्य सरकारने लावलेल्या करामुळे वाढल्या असून यात केंद्र सरकारचा संबंध नाही, काँग्रेसचे आंदोलन बेगडी आहे”
“पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती आणि केंद्र सरकार यांचा काही एक संबंध नसून, पेट्रोल डिझेल वरील किंमत हे कंपन्यांवर अवलंबून असून हे करण्याचा निर्णय काँग्रेस सरकारचा होता”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वास्तविक पाहता भारतातील पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती ह्या कच्चा तेलाच्या किमंती वर अवलंबून असतात जेव्हा केव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढतात तेव्हा आपल्या बाजारात किमती वाढणे स्वाभाविक आहे पण जेव्हा तेलाच्या किमती कमी होतात तेव्हा केंद्र सरकार या गोष्टीचा फायदा घेत जास्तीत जास्त कर लावून महसूल जमा करण्याचा प्रयत्न करते, केंद्र सरकारची प्रत्यक्ष मालकी असलेल्या सरकारी कंपन्या म्हणजेच IOCL, HPCL, आणि BPCL यांच्याकडे किंमती ठरवण्याचे अधिकार असून सरकारचे नियंत्रण आवश्यक असते, फडणवीस हे कशाच्या आधारावर केंद्र सरकार सोडून फक्त राज्य सरकारवर आरोप करत आहेत हे कळेनासे आहे.
भारतीय ग्राहक हे पेट्रोल आणि डिझेल वर २५० टक्के कर देतात, सद्यस्तिथीला पेट्रोलची आधारभूत किंमत ₹१८ प्रति लिटर असून आपल्याला ते जवळ जवळ ८० ते ९० रुपये लिटरप्रमाणे मिळत आहे. वरील पैसे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये विभागून घेतल्या जातात.