Home अर्थजगत ३१ डिसेंबर पर्यंत आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक नाही केलं तर...

३१ डिसेंबर पर्यंत आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक नाही केलं तर भविष्यात येतील ‘या’ अडचणी…

0

जर अजूनही तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर ही बातमी स्पेशल तुमच्यासाठी आहे. कारण, आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे आणि या वेळेत जर तुम्ही आधार-पॅन लिंक केलं नाही तर भविष्यात तुम्हाला हे महागात पडू शकतं. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आधार-पॅन लिंक करणं अनिवार्य आहे अशी माहिती आयकर विभागाने दिलो आहे. त्या संधार्भात आयकर विभागाने ट्विट देखील केलं आहे.

यापूर्वी देखील आधार-पॅन कार्ड लिंक विनंती आयकर विभागाने केली होती ज्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर होती. त्यातच आणखीन मुभा वाढवून ३१ डिसेंबर २०१९ करण्यात आली आहे. जर तुम्ही भविषयत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणार असाल तर येत्या ३१ डिसेंबर पर्यंत तुम्हाला आधार-पॅन लिंक करणं आवश्यक व अनिवार्य आहे. एवढंच नाही तर अनेक सरकारी, बँकिंग, इन्कम टॅक्स संधार्भात कामे करण्यात अडथळे येऊ शकतात. म्हणून लवकरात लवकर आपलं आधार व पॅन कार्ड लिंक करून घ्या.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याचे दोन पर्याय आहेत. www.incometaxindiaefiling.gov.in या संकेस्थळावर जाऊन तुम्ही आपलं आधार-पॅन कार्ड लिंक करू शकता किंवा UIDPAN स्पेस <१२ अंकी आधार नंबर> स्पेस <१० अंकी पॅन नंबर> असा एसएमएस टाइप करून ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर सेंड करू शकता.