Home अर्थजगत वाढत्या सायबर क्राईम मुळे SBI, ICICI व HDFC बँकेने डेबिट आणि क्रेडिट...

वाढत्या सायबर क्राईम मुळे SBI, ICICI व HDFC बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्डचे नियम बदलले…

0

दिवसेंदिवस आंतराष्ट्रीय फसवणुकीचे प्रमाण वाढतच आहे. दरम्यान लोकडाऊनच्या काळात यात वाढ झाली. यावर पर्यायी उपाय म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक आज नंतर 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधी काही नियम बदलणार आहे असे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात बँकांनी ग्राहकांना मेसेज द्वारे तशी पूर्वसूचनाही दिली आहे. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री पासून डेबिट व क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होतील. या नव्या नियमांनुसार ग्राहकांना आंतरराष्ट्रीय, ऑनलाईन व कॉन्टॅक्टलेस कार्डवरून व्यवहार करण्यासाठी आता वेगळे वेगळे नियम असणार आहेत ज्यानुसार ग्राहकांना वेगळी प्राथमिकता सांगावी लागणार आहे. कोरोना संकटामुळे बँकांना आरबीआयने नवे नियम लागू करण्याकरीता ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती.

लोकमत न्यूज १८ च्या एका रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय फसवणुकीमुळे आरबीआयने नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्यात ग्राहकांना आता प्रथम क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर कशासाठी करायचाय हे आधी स्पष्ट करावे लागणार आहे व त्यानुसार आंतरराष्ट्रीय, ऑनलाईन व कॉन्टॅक्टलेस कार्डचा वापर निवडाचा आहे. यामुळे गरज असेल तेव्हाच या सुविधा वापरता येणार आहेत. या व्यवहारासाठी ग्राहकांना बँकेला सांगावे लागणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्झेक्शन करताना देशांतर्गत वापराला परवानगी असणार आहे. या सुविधा कार्डसोबत असतीलच शिवाय ग्राहकही आपल्या सोयीनुसार सुविधा निवडू शकतात.

वेगवेगळे नियम अमलात आणल्याने ग्राहकांनी नवी नियमाच्या सविस्तर माहितीसाठी आपल्या बँकेला समक्ष भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी.