Home अर्थजगत “भारताची आर्थिक परिस्थिती चांगली; तर जागतिक महामंदी अटळ” : RBI गव्हर्नर

“भारताची आर्थिक परिस्थिती चांगली; तर जागतिक महामंदी अटळ” : RBI गव्हर्नर

0

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिदास दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा आढावा घेत समोर आलेल्या अथवा येणा-या परिस्थितीबाबत माहिती दिली. देशाची अर्थव्यवस्था ही पहिल्यापेक्षा थोडी कोलमडून गेली आहे. हे नुकसान कमी करण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या स्थितीमध्ये भविष्यात जागतिक मंदी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना मुळे GDP चा वेग 1.9 इतका राहणार आहे. G20 देशांमध्ये भारताची स्थिती समाधानकारक आहे. जगभरात 9 ट्रिलियन डॉलर इतके नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शक्तिकांत दास यांनी रिव्हर्स रेपो रेट मध्ये घट झाल्याची घोषणा केली आहे. रिजर्व्ह बँकेकडून रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची घट केली आहे. त्याचबरोबर आता ही 3.75 टक्के इतकी झाली आहे. त्याशिवाय 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची RBI ने घोषणा केली आहे.

RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी कोरोना मुळे GDP चा वेग मंदावेल मात्र काही कालावधीनंतर हा वेग जोर पकडेल. भारताची GDP 1.9 च्या वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे. G20 देशांमध्ये ही स्थिती सर्वसाधारण बरी आहे.
त्याचबरोबर भारतातील ATM पूर्ण क्षमतेसह 90% काम करत असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांची कामे सुरु आहेत. बँकांजवळ पैशाची कमतरता नाही असेही त्यांनी सांगितले.